स्वागतम ...

आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
अंतरंगाचं प्रतिरूप मांडण्याचा हा प्रयत्न आहे.. मला बोलायला फार आवडतं पण आपल्या हक्काचं व्यासपीठ नेहमी मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणून ही सगळी उठाठेव!! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत!

Friday, January 31, 2014

मी कोण? (फक्त विनोदासाठीची रचना)

तसा आहे मी माणूस फार मोठा,
मानसन्मानाचा नाही मले तोटा!!

अटलजीच्या मंत्रिमंडळात मले मोठी जागा,
मशिनीत असतो जसा महत्वाचा धागा!

 मीच होणार होतो भारताचा पंतप्रधान!
परंतु अटलजीच्या विनतिले देला  मान!!

म्हणून झालता पंतप्रधान अटल बिहारी!
मले नसते फुरसत म्हणून भानगड सारी!

बीजेपीच माझ्याशिवाय पान नाही हालत,
कॉंग्रेस च तर माझ्यापुढ काही नाही चालत!

आपल्या क्रिकेट टीम ले हवं मावं नेतृत्व,
रोज विनंत्या करतात दाखवण्या कर्तुत्व!

टेलिफोनचा आकार मले नव्हता भावला,
म्या सोडला म्हणून ग्राहम बेलन शोध लावला!!

ह्रितिक पेक्षा डबल हाय मव्हा भाव,
हौलीवूड मंधेही सगळीकड मव्हच नाव!!

म्हायापुढ काय मुकेश काय कुमार सानू ,
मी हाय ज्ञानेश्वर ते हायेत ज्ञानू !!!

मले जरी नसली पुरस्कारायची हाव,
तरी ऑस्कर साठी पुढ आल मवच नाव!!

नोबेल सारखे हजारो रोज मले खेटतात,
पण मी हाक्ल्यामुळे  दुसऱ्यायले भेटतात!!

भारतरत्न काय अन काय महाराष्ट्र भूषण,
या  पुरस्कारायन  लागते माह्या नावाले दूषण!!

किती हेत बंगले अन किती हेत माड्या,
माह्या मांग पुढ हिंडतात लाखो लक्झरी गाड्या !!

तुमाले माहित नसन मी धंदा काय करतो,
अमेरिकेत पैसा नाही तेवढा इन्कम tax भरतो!!

कोणी हाय का माई का लाल म्हायापुढ!!
महीच कीर्ती आहे दूर दूर चोहीकड!!!

ऐवढ्या कामाचा मी आहे माणूस,
आता ह्याच्यापुढ तू मले नको जाणूस!!!

Sunday, January 13, 2013

काही वेगळ्या चारोळ्या ...















"त्याच्या प्रत्येक पावलासरशी 
अंधार दाटत चालला होता ..
या अंधारातच एका माणसाने
दुसरा माणूस खाल्ला होता !! "




"तुझ्यातील प्रत्येक रूपाचं,
दर्शन मी घेतलं नव्हत!
हेच तर होत कारण ते 
जे जीवावर बेतलं होत!!"




"नकोस बघू स्वप्ने तू 
स्वप्ने का कधी खरी होतात?
असतात काही आजारे
जी मरणोत्तर बरी होतात!!"

Monday, August 20, 2012

"प्रेमकहाणी"



"पावसात भिजलेली,
थोडीशी लाजलेली,
'ती 'गेली जवळून,
मन गेले हुरुळून!

 
ओले चिंब अंग, 
नव्हते कुणी संग,
गेली घेऊन मन,
असं 'ती'च यौवन!


लांबसडक केश,
भिजलेलासा वेश,
मनी लागली आस,
असा केशांचा मृदुपाश!!

तिचे ओलसर डोळे,
भाव चेहऱ्यावरती भोळे,
तिच्या ओठांवरची खळी,
माझ्या हृदयाशी खेळी!!

 
पावसाने भिजलो जरी,
आग लागली तरी,
विरहाची ही आग
तीच माझ्या प्रेमाचा भाग!!


भेट होती ती क्षणाची,
माझ्या प्रीतीच्या मनाची,
संबंध अजून आहे,
माझा अंत पाहत आहे!!

विरहवेदना या,
कर माझ्यावर दया,
तुझ्या प्रेमाचा मी पूजारी,
तूच देवी मला तारी!!

 
मन झालं अधीर,
कर्ण झाले बधीर,
डोळे फक्त तुलाच पाही,
तुझ्याविना मला अर्थ नाही!

आसुसलेलं मन
व्यर्थ वाटे जीवन!
तिचा असेल संग,
तेंव्हाच येईल रंग!!

 
'ती'च सुंदर लावण्य
रसरसत तारुण्य,
ओल्या पावसाची रानी
हिच माझी प्रेमकहाणी!!"

Sunday, August 19, 2012

काही Fishponds

१ ज्योती : "नावच फक्त ज्योती, अंधार पसरला भोवती!!"

२ कृष्णार्जुन: "कृष्ण व अर्जुन असतात जेथे, तेथे असते ज्ञान,
कृष्ण व अर्जुन एकात झाले, ज्ञानाची झाली घाण! "

३ "थांब तुला सांगतो त्या पाटलाची गोष्ट, त्याची पोरगी हाय लई जबरदस्त!"

४ "त्याचे असे प्रेम, बहकला जाम, काय करू काम, कळत नसे !!"


५ "मुलगी एक, चाहते अनेक, चाहत्यांच्या नशेत, धुंद झाली!! "

६ "प्रीतीच्या मायाळू फुला, मला लागला तुझा लळा, मैत्रीचा पिकवू मळा, प्रेम वाहे झुळझुळा!! "

Saturday, January 29, 2011

दूर जातांना...



"डोळ्यांसमोर तू उभी होतीस, डोळे बंद करून घेतले,
डोळ्यांत तुझीच प्रतिमा दिसली, डोळे पाण्याने भरून घेतले!!

मनात तुझाच विचार आला, त्यालाही टाळायचं ठरवलं
आता तू माझी नाहीच, हे सुद्ध्या त्याला भरवलं!!

तुझ्याशिवाय जेव्हा जीवन जगण नकोस झालं
देहार्पण करून मोकळ व्हावं हे ही मनात आलं!!

त्या करता जेव्हा देहाने शोधून काढला परमात्मा
नकोय म्हणे नश्वर देह, कर म्हणाला अर्पण आत्मा!!

आत्म्याच्या शोधार्थ मी दारोदार भटकलो,
पण शेवटी लक्षात आलं की मी तुझ्यातच तर अडकलो!!

आता तूच सांग, मी त्या परमात्म्याला सांगू तरी काय सांगू?
आणलाही असता दुसरा देह, दुसरा आत्मा कुठून आणू?
दुसरा आत्मा कुठून आणू??"

Friday, August 20, 2010

विनोदी चारोळ्या


"मला जावाई करायचं
तुझ्या बापानं ठरवलं नसणार,
अन मी होतो म्हणटल,
तर जागीच ते कंबर कसणार!! "

"तुझ्या साठी काहीही करीन,
इतका मी काही खुळा नाही!
तुला दुखलं, तर मला दुखायला,
मी काही तुझा जुळा नाही!!"

"तुझी नि माझी जोडी
तशी छान छानच वाटेल,
तुझ्या बापाच्या पैश्यांवर मी,
आपलं दुकान थाटेन!!"

Wednesday, June 30, 2010

पाउस...















"कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो,
अन अलगद मला माझ्या कल्पित भावविश्वात नेतो!

तिथे असते तू, तुझ्या बऱ्याच आठवणी असतात,
मनातल्याच गोष्टी मनात खोलवर रुतून बसतात!
आठवणींना उजाळा मिळतो, काहीसा तजेला मनालाही,
आठवतात काही गोष्टी, ज्या नाहीत सांगता येत कुणालाही,
आठवणींमध्येच तू थेट माझ्या हृदयात शिरतेस,
खोटा राग दाखवून तू हळूच माझ्यावर चिडतेस!!
तुझा तो काहीसा रागिट चेहरा मी पुन्हा आठवतो,
आणि तुझ ते निशब्द प्रेम मी हळूच हृदयात साठवतो!

देव जाणे कस पण मग तुला ही ते समजत,
चेहऱ्यावर तुझ्या लाजेच ते छान हास्य उमलत!!
ती हास्यकळी मला सदा सर्वदा साद घालत असते,
खरय प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज भासत नसते!

तुला माझ्या नि मला तुझ्या हृदयाच्या भावना कळतात,
आकस्मितपणे आपली पाऊले परस्परांकडे वळतात!!
तू माझ्या कवेत येतेस, खांद्यावर टेकते तुझी मान,
डोळे आपोआप बंद होतात, वाढत जाते प्रेमतहान!

पण आता हे अशक्य आहे, कारण तू जवळून निघून गेलीस,
माझ्या या निःस्वार्थ प्रेमाची ही तू मला शिक्षा दिलीस!
आठवून हे सार, गालावर दोन अश्रू ओघळतात,
अगतिकपणे चुपचाप, पडत्या पावसात विरघळतात!
मीही तुझ्या उरलेल्या आठवणींमध्ये विरून जातो,
कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो!!
कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो!!"