
"कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो,
अन अलगद मला माझ्या कल्पित भावविश्वात
नेतो!
तिथे असते तू, तुझ्या बऱ्याच आठवणी असतात,
मनातल्याच गोष्टी मनात खोलवर रुतून बसतात!
आठवणींना उजाळा मिळतो, काहीसा तजेला मनालाही,
आठवतात काही गोष्टी, ज्या नाहीत सांगता येत कुणालाही,
आठवणींमध्येच तू थेट माझ्या हृदयात शिरतेस,
खोटा राग दाखवून तू हळूच माझ्यावर चिडतेस!!
तुझा तो काहीसा रागिट चेहरा मी पुन्हा आठवतो,
आणि तुझ ते निशब्द प्रेम मी हळूच हृदयात साठवतो!
देव जाणे कस पण मग तुला ही ते समजत,
चेहऱ्यावर तुझ्या लाजेच ते छान हास्य उमलत!!
ती हास्यकळी मला सदा सर्वदा साद घालत असते,
खरय प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज भासत नसते!
तुला माझ्या नि मला तुझ्या हृदयाच्या भावना कळतात,
आकस्मितपणे आपली पाऊले परस्परांकडे वळतात!!
तू माझ्या कवेत येतेस, खांद्यावर टेकते तुझी मान,
डोळे आपोआप बंद होतात, वाढत जाते प्रेमतहान!
पण आता हे अशक्य आहे, कारण तू जवळून निघून गेलीस,
माझ्या या निःस्वार्थ प्रेमाची ही तू मला शिक्षा दिलीस!
आठवून हे सार, गालावर दोन अश्रू ओघळतात,
अगतिकपणे चुपचाप, पडत्या पावसात विरघळतात!
मीही तुझ्या उरलेल्या आठवणींमध्ये विरून जातो,
कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो!!
कोसळणारा पाउस मला तुझी आठवण करून देतो!!"