स्वागतम ...

आपलं स्वागत आहे! ह्या पानाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
अंतरंगाचं प्रतिरूप मांडण्याचा हा प्रयत्न आहे.. मला बोलायला फार आवडतं पण आपल्या हक्काचं व्यासपीठ नेहमी मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणून ही सगळी उठाठेव!! मराठीतील माझ्या रचना आणि लेखं मी येथे जमवितो आहे. आपल्या प्रतिक्रिया सदर आमंत्रित आहेत!

Friday, January 31, 2014

मी कोण? (फक्त विनोदासाठीची रचना)

तसा आहे मी माणूस फार मोठा,
मानसन्मानाचा नाही मले तोटा!!

अटलजीच्या मंत्रिमंडळात मले मोठी जागा,
मशिनीत असतो जसा महत्वाचा धागा!

 मीच होणार होतो भारताचा पंतप्रधान!
परंतु अटलजीच्या विनतिले देला  मान!!

म्हणून झालता पंतप्रधान अटल बिहारी!
मले नसते फुरसत म्हणून भानगड सारी!

बीजेपीच माझ्याशिवाय पान नाही हालत,
कॉंग्रेस च तर माझ्यापुढ काही नाही चालत!

आपल्या क्रिकेट टीम ले हवं मावं नेतृत्व,
रोज विनंत्या करतात दाखवण्या कर्तुत्व!

टेलिफोनचा आकार मले नव्हता भावला,
म्या सोडला म्हणून ग्राहम बेलन शोध लावला!!

ह्रितिक पेक्षा डबल हाय मव्हा भाव,
हौलीवूड मंधेही सगळीकड मव्हच नाव!!

म्हायापुढ काय मुकेश काय कुमार सानू ,
मी हाय ज्ञानेश्वर ते हायेत ज्ञानू !!!

मले जरी नसली पुरस्कारायची हाव,
तरी ऑस्कर साठी पुढ आल मवच नाव!!

नोबेल सारखे हजारो रोज मले खेटतात,
पण मी हाक्ल्यामुळे  दुसऱ्यायले भेटतात!!

भारतरत्न काय अन काय महाराष्ट्र भूषण,
या  पुरस्कारायन  लागते माह्या नावाले दूषण!!

किती हेत बंगले अन किती हेत माड्या,
माह्या मांग पुढ हिंडतात लाखो लक्झरी गाड्या !!

तुमाले माहित नसन मी धंदा काय करतो,
अमेरिकेत पैसा नाही तेवढा इन्कम tax भरतो!!

कोणी हाय का माई का लाल म्हायापुढ!!
महीच कीर्ती आहे दूर दूर चोहीकड!!!

ऐवढ्या कामाचा मी आहे माणूस,
आता ह्याच्यापुढ तू मले नको जाणूस!!!

No comments:

Post a Comment